नांदेडमध्ये उद्या ‘अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन’ ‘आर्टी’ संस्थेच्या वतीने शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात आयोजन

नांदेड: महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाअंतर्गत असलेल्या साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) तर्फे रविवार, १२ ऑक्टोबर रोजी नांदेड येथील शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाचे उद्घाटन नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षपदी परभणीचे प्राचार्य डॉ. दशरथ इबतवार यांची निवड झाली आहे. उद्घाटन समारंभास खासदार अशोकराव चव्हाण, मंत्री गिरीश महाजन, संजय शिरसाट आणि माधुरी मिसाळ मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. या संमेलनात महात्मा गांधी मिशन विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर तर्फे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना प्रदान करण्यात आलेल्या D.Litt. पदवीचा गौरव समारंभही होणार आहे. समारोप कार्यक्रमास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार प्रमुख अतिथी, तर मंत्री शंभूराज देसाई मार्गदर्शक म्हणून सहभागी होणार आहेत. यावेळी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला जाणार आहे. सकाळी ८ वाजता जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे उद्घाटन होईल. संमेलनानंतर ‘गाथा लोकशाहीरांची’ हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे. या संमेलनात सहभागी होण्याचे आवाहन स्वागताध्यक्ष मारुती वाडेकर आणि आयोजक समितीने केले आहे.
Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp