किनवट : तालुक्यातील अंबाडी येथील रहिवाशी तथा उत्तमज्योत आदिवासी आश्रमशाळा, ढाणकी येथील माध्यमिक शिक्षक प्रमोद सोमाजी तामगाडगे यांना ‘बी द चेंज फाउंडेशन’, शिर्डी (जि. अहिल्यानगर, महाराष्ट्र) यांच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय सन्मानाबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या नवोन्मेषी उपक्रमांमुळे, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेल्या प्रयत्नांमुळे आणि शैक्षणिक तसेच सहशालेय कार्यातील समर्पित सेवाभावामुळे तामगाडगे यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या निष्ठा, परिश्रम आणि विद्यार्थ्यांप्रती असलेल्या संवेदनशीलतेमुळे अनेक विद्यार्थी प्रेरित झाले आहेत.
गुणवत्तापूर्ण शिक्षण व समाजात सकारात्मक परिवर्तन घडविणाऱ्या त्यांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांना या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Post a Comment
0 Comments