नांदेड : राज्यातील ओबीसी, भटके-विमुक्त, बलुतेदार, मायक्रो ओबीसी समाज बांधवांनी आपल्या न्यायहक्कांसाठी पुकारलेला “एल्गार महामोर्चा” येत्या बुधवार, २९ ऑक्टोबर २०२५ रोजी नांदेड शहरात मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या मोर्चात राज्यभरातून लाखोंच्या संख्येने समाजबांधव सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
मोर्चाची सुरुवात कृ.उ.बा.स. मैदान, जुना मोंढा येथून होऊन अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य रॅली काढण्यात येईल. मोर्च्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाहिर सभा होणार असून, विविध मागण्यांबाबत शासनाला निवेदन देण्यात येईल.२ सप्टेंबरचा ओबीसी विरोधी शासन निर्णय (जी.आर.) तात्काळ रद्द करावा,महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना त्वरित करण्यात यावी,५८ लाख बेकायदेशीर कुनबी नोंदी रद्द करण्यात याव्यात,प्रत्येक जिल्हा व तालुकानिहाय ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची निर्मिती करावी,या मागण्यांसाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.या मोर्चाचे आयोजन नांदेड जिल्हा ओबीसी, भटके-विमुक्त, बलुतेदार, मायक्रो ओबीसी समन्वय समिती, नांदेड यांच्या वतीने करण्यात आले आहे. आयोजकांनी राज्यातील सर्व ओबीसी समाजबांधवांना “आपल्या न्यायहक्कासाठी, आपल्या भावी पिढीच्या भवितव्यासाठी” लाखोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.मोर्चाच्या अधिक माहीतीसाठी खालील मोबाईल नंबर वर संपर्क साधन्याचे आवाहन एकनाथ बत्तलवाड ब्राम्हणवाडेकर यांनी केले आहे ; ९४०५७७३००७, ९८२३६९४२०५, ९८९०२०७९९४, ९०९६१८२८८८, ९९२१५३५७४६, ९३७२२४५२७५
Post a Comment
0 Comments