सक्षम ताटे हत्याकांड : जातीय द्वेषाचा जनवादी महिला संघटनेकडून तीव्र निषेध

 




नांदेड : प्रेमात अडथळा ठरत असल्याच्या संशयातून दलित तरुण सक्षम ताटेची केलेली निर्घृण हत्या आणि त्यानंतर प्रेयसी आचलने त्याच्या पार्थिवाजवळ केलेला आंतरधर्मीय विवाह—या घटनेने जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. तीन वर्षांच्या नात्याला जातीय विषारी द्वेषाचा बळी देत मुलीच्या वडिलांनी आणि भावांनी सक्षमची क्रूर हत्या केल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

या अमानुष कृत्याचा अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेने जोरदार निषेध करत सक्षमच्या कुटुंबाला ठाम पाठिंबा दिला. संघटनेच्या प्रतिनिधींनी थेट घरी भेट देत, “हा लढा तुमचा एकट्याचा नाही—आम्ही सोबत आहोत,” असा स्पष्ट संदेश दिला.

यावेळी समाज कल्याण अधिकारी मा. हिंगमिरे यांनीही तातडीने मदतीची घोषणा केली. कुटुंबास ८ लाख १० हजार रुपयांची आर्थिक मदत, सक्षमच्या आईला शासकीय नोकरी, कुटुंब भूमिहीन असल्यास ४ एकर जमीन, तसेच घरकुल देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

या भेटीत राज्य सहसचिव व जिल्हाध्यक्षा कॉ. लता गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्षा कॉ. उज्वला पडलवार, कॉ. प्रेमला पतंगे यांच्यासह कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. संघटनेने सक्षमच्या हत्येला “जातीय विषाची विकृत पराकाष्ठा” म्हणत गुन्हेगारांवर कठोरात कठोर कारवाईची मागणी केली आहे.




Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp