नांदेड : आगामी जिल्हा परिषद
, पंचायत समिती व नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून संघटनात्मक तयारीसाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. या अनुषंगाने नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी (उत्तर) चे जिल्हाध्यक्ष राजेश भाऊराव पावडे यांच्या आदेशानुसार सुभाष लोने यांची नांदेड तालुका निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्तीबाबत जारी करण्यात आलेल्या पत्रानुसार, श्री. लोने यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सर्व नेतेमंडळींची बैठक बोलवून संघटनाची निवडणूकपूर्व तयारी मजबूत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
जिल्हाध्यक्ष श्री. पावडे यांनी सांगितले की, “काँग्रेस पक्षाची ताकद ही कार्यकर्त्यांमध्ये आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये पक्ष अधिक सक्षमपणे उभा राहावा यासाठी प्रत्येक तालुक्यातील निरीक्षकाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.”
या नियुक्तीमुळे तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवीन उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, संघटन अधिक बळकट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Post a Comment
0 Comments