किनवट,दि.३१ : तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने देशाचे पहिले गृहमंत्री आणि लोहपुरुष म्हणून ओळखले जाणारे स्व. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त तसेच देशाच्या माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन आज(दि.३१)तालुका काँग्रेस कार्यालयात करण्यात आले.
या प्रसंगी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष के. सुर्यकांत रेड्डी, शहराध्यक्ष गिरीषभाऊ नेम्मानीवार, जेष्ठ नेते सिराज जिवानी, माजी नगराध्यक्ष मुर्ती कलगोटूवार, काँग्रेस सरचिटणीस अब्दूल खालिद, कृ.ऊ.बा.स. सदस्य अब्दूल सत्तार खिच्ची, ओबीसी जिल्हाध्यक्ष वसंत राठोड, काँग्रेस सोशल मीडियाचे प्रमुख शेख इम्रान चाँदसाब, किसान सेलचे अब्दूल गनी कुरेशी, अलीमोद्दिन भाई, शेख शाद्ल भाई, कार्यालय सचिव माधवराव खेडकर, युवक काँग्रेसचे जवाद आलम, निर्मला कुमरे, संजीव रेड्डी तसेच माजी नगरसेवक लक्ष्मीपती दोनपेल्लीवार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमात सरदार पटेल यांच्या एकात्मतेच्या विचारांचा आणि इंदिरा गांधी यांच्या कार्याचा गौरवपूर्वक उल्लेख करून त्यांना अभिवादन करण्यात आले. उपस्थितांनी देशाच्या एकतेसाठी आणि प्रगतीसाठी दोन्ही नेत्यांच्या योगदानाची आठवण करून एकात्मतेचा संदेश दिला.

Post a Comment
0 Comments