मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नांदेड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या नव्या कार्यकारिणीला औपचारिक मान्यता दिली आहे. नांदेड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अब्दुल सत्तार अब्दुल गफुर यांनी सादर केलेल्या प्रस्तावास ३० ऑक्टोबर २०२५ रोजी मंजुरी देण्यात आली असून यासंदर्भातील अधिकृत पत्र टिळक भवन, मुंबई येथून जारी करण्यात आले आहे.
या नव्या कार्यकारिणीत विविध पदांवर खालील प्रमुख नेत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे ;
कार्याध्यक्ष म्हणून बालाजी चव्हाण, किशोर भवरे व महेश देशमुख तरोडेकर यांची निवड करण्यात आली आहे. तसेच उपाध्यक्षपदी आनंद चव्हाण, रमेश गोडबोले, शेख हुसेन शामदमियाँ, शोएब हुसेन मजहर हुसेन, पप्पु शर्मा, शेख मुखतार, गगन यादव, अलिम खान, अ. हमिद अ. खादर, फेरोज भाई, सय्यद असलम आणि सय्यद रिहान यांची नियुक्ती झाली आहे.
कोषाध्यक्षपदी अब्बास हुसैन (मुन्ना) यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली असून सरचिटणीस म्हणून रमेश चित्ते, आर. एस. खान, अॅड. विलास भोसले, आनंदराव कल्यानकर, अंबादास रातोडे, मो. अतिक, डॉ. मो. असीफ, चांदु मेटकर, शेख हबीब, मनोजसिंह ठाकूर, तुषार पोहरे, गौतम शिरसाठ, नागराज सुलगेकर, नईम शेख, अब्दुल रौफ आणि सय्यद रिजवान पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सचिवपदी सुरेश प्रभाकर पवार, मधुकर सकते, अ. वहाब अ. रजाक, संजय शर्मा, युसूफ खान, गणेश गोपीनाथ, अमोल जाधव आणि मगदुम पाशा यांची निवड झाली आहे. सहसचिव म्हणून संदिप गिरी, अ. मुजिब रहिम, चंद्रकांत बोरगावकर, शेख जावेद यांची ,तर संघटन सचिवपदी धनंजय उमरीकर, विनायक कोकाटे व चंद्रमुनी कांबळे यांची निवड झाली आहे.
याशिवाय, कायम निमंत्रित म्हणून जिल्ह्यातील माजी अध्यक्ष, माजी मंत्री, आजी-माजी खासदार, आमदार, निवडणूक उमेदवार व आघाडी संघटनांचे पदाधिकारी यांचा समावेश करण्यात आला आहे.
या नव्या कार्यकारिणीबाबत प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष अॅड. गणेश पाटील यांनी सर्व संबंधितांना सूचित केले असून, पक्ष संघटन अधिक बळकट करण्यासाठी नव्या कार्यकारिणीवर सर्वांची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
Post a Comment
0 Comments