वर्धा : सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त दिवंगत मंदाताई के. पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘स्मृतिगंध सोहळा’ हा प्रेरणादायी कार्यक्रम येत्या ११ नोव्हेंबर २०२५ रोजी सावंगी (मेघे), वर्धा येथील विजय लॉन येथे भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्याचा मुख्य आकर्षण ठरणार आहे महिलांच्या सामाजिक आ
णि वैचारिक योगदानावर आधारित परिसंवाद — “आंबेडकरी चळवळीत महिलांचे योगदान” हा विषय. हा परिसंवाद दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत पार पडणार असून, या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ
परिसंवादानंतर दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत ‘रमाई गौरव पुरस्कार’ वितरण समारंभ होणार असून, हा सत्कार सोहळा आंबेडकरी चळवळीचे सुप्रसिद्ध महागायक मा. प्रकाशनाथ पाटणकर यांच्या शुभहस्ते संपन्न होईल. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील सामाजिक कार्यकर्ते, गायक, कवि, विचारवंत आणि कलावंतांचा या प्रसंगी गौरव करण्यात येणार आहे.
संध्याकाळी ५ ते १० वाजेपर्यंत ‘गीत प्रबोधन’ या संगीतप्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक-गायिका भीमबुद्ध गीतांचा मनमोहक संगितमय सादरीकरण करतील. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि संगीत नियोजन मा. अॅड. नागसेन मानकर, नागपूर यांच्याकडे असेल.
कार्यक्रमाच्या अखेरीस सर्व उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन सायंकाळी ६ वाजल्यापासून करण्यात आले आहे.
या स्मृतिगंध सोहळ्याचे आयोजन कवी के. पाटील (अध्यक्ष, प्रबोधनकार कला साहित्य संघ, वर्धा) तसेच प्रविण के. पाटील, आशिष के. पाटील, विक्रम के. पाटील, कु. सेल्वी, श्राव्या, कोकोरो व समस्त पाटील परिवार यांनी केले असून, तांत्रिक सहकार्य ऑडिओट्रॉनिक साऊंड अँड लाईट्स, केम्स असोसिएट्स वर्धा तसेच सर्व कवी, गायक, कलावंत – महाराष्ट्र राज्य यांनी दिले आहे.
हा कार्यक्रम मंदाताईंच्या कार्याची आणि आंबेडकरी चळवळीत महिलांच्या योगदानाची प्रेरणादायी उजळणी ठरणार असून, समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांनी या सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
