कंधार : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे (VBA) युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या प्रचार दौऱ्याला कंधारमध्ये आज(दि.२७)उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वैदू आणि वडार समाजातील नागरिकांसोबत त्यांनी घेतलेली थेट संवाद बैठक विशेष ठरली.
या बैठकीत समाजाच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. नागरिकांनी पाणीपुरवठा, शिक्षण, निवास, रोजगार अशा स्थानिक अडचणी मांडल्या. सुजात आंबेडकर यांनी या सर्व प्रश्नांची गांभीर्याने नोंद घेत, वंचित बहुजन आघाडी तळागाळातील नागरिकांसाठी पर्यायी शासन व्यवस्था उभी करण्यास कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले.
निवडणूक प्रचाराचा गतीमान टप्पा सुरू असताना नागरिकांशी झालेला हा प्रत्यक्ष संवाद VBA साठी महत्त्वाचा मानला जात आहे. संवाद सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून नागरिकांनी आपला पाठिंबा दर्शविला.
या कार्यक्रमाला VBA चे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये राज्य सदस्य अविनाश भोसीकर, जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले, प्रशांत इंगोले, श्याम कांबळे, आकाश जोंधळे, राहुल सोनसळे यांचा समावेश होता.


