न्यायाचा दरवाजा सर्वांसाठी खुला ठेवण्याचे विधी सेवा समितीचे ध्येय : न्या. पी. एम. माने कायद्याबाबत सजग व्हा, न्याय मिळवण्यासाठी पुढे या – नागरिकांना आवाहन




किनवट : 
समाजातील आदिवासी, वंचित, दुर्बल आणि आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी विधी सेवा प्राधिकरण कटिबद्ध आहे. कोणीही न्यायापासून वंचित राहू नये, यासाठी कायदेशीर मदतीचा लाभ घेणे अत्यंत आवश्यक आहे,” असे स्पष्ट मत किनवट सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आणि  तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष पी. एम. माने यांनी व्यक्त केले.

 राज्यपाल दत्तक गाव    जवरला (ता. किनवट) येथे शनिवारी(दि. २२) तालुका विधी सेवा समिती, किनवट यांच्या मार्फत आयोजित कायदेविषयक जनजागृती शिबिरात ते अध्यक्षीय समारोप करताना  बोलत होते.


 ||न्याय मिळवण्यासाठी पुढाकार आवश्यक – न्यायाधीश माने||

न्या. माने म्हणाले की, “कायदा हा सर्वांसाठी समान आहे. अनेकांना योग्य मार्गदर्शन नसल्याने ते अन्याय सहन करतात. विधी सेवा समिती विनामूल्य कायदेशीर मदत, मार्गदर्शन आणि आवश्यक दस्तऐवजीकरण उपलब्ध करून देते. नागरिकांनी आपल्या समस्यांचे निवारण करण्यासाठी पुढाकार घ्यावा.”


|| विविध विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन||

शिबिरात उपस्थित वकील मंडळींनी खालील विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले :

  • राष्ट्रीय शिक्षण धोरण
  • संविधान व मूलभूत अधिकार
  • आदिवासी हक्क आणि शासकीय योजना
  • राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाची भूमिका
  • सायबर गुन्हे प्रतिबंध आणि कायदेशीर उपाय
  • महिलांवरील अत्याचार, कौटुंबिक कायदे इत्यादी

|| मान्यवरांची उपस्थिती||

कार्यक्रमाला अॅड. के. के. मुनेश्वर (अध्यक्ष, अभिवक्ता संघ, किनवट), वसंत वाघमारे (विस्तार अधिकारी, पंचायत समिती), अॅड. डी. जी. काळे, अॅड. आर. डी. सोनकांबळे, अॅड. व्ही. एस. सूर्यवंशी, अॅड. पी. पी. गावंडे, वकील संघाचे उपाऊ अॅड. टी. आर. चव्हाण, अॅड. मिलिंद सरपे, अॅड. सुनील येरेकार, अॅड. आर. पी. पुरुषोत्तमवार, अॅड. पंडित घुले, अॅड. सचिन तलांडे, अॅड. संकेत राठोड, अॅड. दीपा सोनकांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.


|| ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग||

या शिबिरास सरपंच नमिता गेडाम, माधवराव मरस्कोले, संतोष चांदेकर, गजानन मरस्कोले, राहुल लिंगमपेलिवार, सुमंबाई शेंद्रे, मोतीबाई तुमराम, समदूरा कुमरे, ग्राम अधिकारी पांचाळ, रामराव खामनकर यांच्यासह महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधव शेंद्रे यांनी केले.

कायद्याविषयी जागरूकता, नागरी हक्कांची समज, आणि न्याय मिळवण्यासाठी कायदेशीर साधनांचा प्रभावी वापर करण्याचे मोलाचे मार्गदर्शन या शिबिरातून ग्रामस्थांना मिळाले.



Post a Comment

Previous Post Next Post
आमच्याशी संपर्क करा