मुंबई : रिपब्लिकन विद्यार्थी सेनेतर्फे ‘संविधान सन्मान सोहळा – उत्सव लोकशाहीचा’ हा भव्य कार्यक्रम सोमवार, दि. २४ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे. श्री. शिवाजी नाट्य मंदिर, दादर (प.) येथे सायं. ६.०० वाजता हा ऐतिहासिक कार्यक्रम संपन्न होणार असून संविधान जलसा, पुरस्कार वितरण व व्याख्यान अशा विविध उपक्रमांनी सन्मान सोहळ्याला विशेष स्वरूप प्राप्त होणार आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक सरसेनानी मा. आनंदराज आंबेडकर साहेब असणार आहेत. तसेच मा. भीमराव आंबेडकर साहेबांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
कार्यक्रमाचे आयोजन रिपब्लिकन सेना, रिपब्लिकन कामगार सेना, रिपब्लिकन युवा सेना, रिपब्लिकन सेना महिला आघाडी, रिपब्लिकन वाहतूक सेना, अल्पसंख्याक आघाडी, ख्रिस्ती आघाडी तसेच रिपब्लिकन विद्यार्थी सेना यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
भारताच्या संविधान मूल्यांचे जतन व संवर्धन, सामाजिक बांधिलकी व लोकशाहीचे भान निर्माण करणे हा या सोहळ्याचा मुख्य हेतू असल्याचे आयोजकांनी सांगितले.
Tags
||महाराष्ट्र||
