मुंबई : भारतीय संविधानाच्या पंच्याहत्तरीनिमित्त ‘आंबेडकरी स्त्री संघटना’तर्फे ‘जागर संविधान संस्कृतीचा – मेत्ताभावनेचा’ या नावाने भव्य संविधान महोत्सव-जागृती परिषदेचे आयोजन २५ नोव्हेंबर २०२५ रोजी दादर (पूर्व) येथील आंबेडकर भवन येथे करण्यात आले आहे. सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत विविध सत्रांद्वारे संविधानमूल्यांचा जागर होत राहणार आहे.
कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांची विशेष उपस्थिती लाभणार असून उद्घाटन मा. डॉ. मिलिंद शिंदे (सुप्रसिद्ध अभिनेता आणि कवी) यांच्या हस्ते होणार आहे. परिषदेचे अध्यक्षस्थानी डॉ. प्रज्ञा दया पवार (प्रसिद्ध कवयित्री, लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या) असतील.
समारोप सत्रात प्रा. डॉ. राम पुनियानी (लेखक, वैद्यकीय संशोधक व सामाजिक विचारवंत) यांचे मार्गदर्शन आणि व्याख्यान हे महोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा
उद्घाटन सत्र: सकाळी १० ते दुपारी १
मध्यंतर: दुपारी १ ते २
संविधानमूल्याधिष्ठित सांस्कृतिक कार्यक्रम: दुपारी २ ते ३
टॉक शो: दुपारी ३ ते ४.३० – सहभागी मान्यवर : सुनील खोब्रागडे, राही भिडे, चयनिका शाह, डॉ. कुंदा प्र. नि., हसीना खान
समारोप सत्र: दुपारी ४.३० ते सायं. ६
उत्सवाचे निमंत्रक प्रा. आशालता कांबळे (संस्थापक – आंबेडकरी स्त्री संघटन) असून सुकाणू समितीत नंदा कांबळे, पुष्पा धाकतोडे, शिरीन लोखंडे, छाया खोब्रागडे, डॉ. निशा शेंडे, श्यामल गरुड, शारदा नवले, छाया कोरेगावकर, माधुरी शिंदे, सुरेखा पैठणे, वैभवी अडसूळ आणि मयुरा सावी यांचा समावेश आहे.
कार्यक्रमस्थळी चहा, नाश्ता व भोजनाची उत्तम व्यवस्था आयोजकांकडून करण्यात आली असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.
Tags
||महाराष्ट्र||
