नांदेड : संविधान दिनाचे औचित्य साधून जेतवन मैदान, गणेश नगर रोडवरील फायर स्टेशनच्या मागे असलेल्या मैदानावर ‘संविधान सन्मान सभा’ आणि बुद्ध-भीम गीतांचा भव्य कार्यक्रम २८ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
व्ही.आय.पी. राहणं, व्ही.आय.पी. खाणं फेम महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक साजन व विशाल चव्हाण यांचा संच या कार्यक्रमात विशेष उपस्थित राहणार असून त्यांच्या गीतांनी परिसर दुमदुमून जाईल, अशी माहिती आयोजकांनी दिली.
कार्यक्रमाचे आयोजक प्रभाग क्र. ७ चे मनिष कांबळे असून A.J. Group, Nanded सहकार्य करत आहे. संविधान दिनाचे महत्त्व जनमानसात रुजविणे, लोकशाही मूल्यांची जपणूक करणे आणि समाजात बंधुता व समानतेचा संदेश पोहोचविणे हा या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले.
सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी करावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
