किनवट : नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक–२०२५ अंतर्गत अध्यक्षपदासाठी दाखल झालेल्या १५ वैध अर्जांपैकी सात उमेदवारांनी आज(ता.२१) अंतिम दिवशी आपली उमेदवारी मागे घेतल्याने आता केवळ आठ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात कायम राहिले आहेत.
नियम १३ अन्वये जाहीर करण्यात आलेल्या मूळ यादीतील १५ उमेदवारांपैकी खान अफरिदी सफिया जहीरुद्दीन खान, खान जरीना साजिद, नेम्मानिवार सुहासिनी श्रीनिवास, नेम्मानिवार अनुजा किरणकुमार, नेम्मानिवार रमा यादवराव, शेख नजमा फकरोद्दीन आणि सय्यद माहेजबिन अकबर यांनी आज(दि. २१) अर्ज मागे घेतले.
आता रिंगणात उरलेले आठ उमेदवार :
- अब्दुल सुमय्या अंजुम अब्दुल मलिक
- काजी राहत तबस्सुम काजी शफीओद्दीन
- खान शबाना अखिल
- मच्छेवार पुष्पा आनंद
- यंड्रलवार सुजाता विनोद
- शेख तयबाबेगम शेख खाजामियों
- शेख शाहेदा शबीर
- सर्पे सूर्यकांता मिलिंद
उमेदवारी माघारीनंतर निवडणूक अधिक रंगात आली असून विविध राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अंतिम लढत आता अधिकच चुरशीची होणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

Post a Comment
0 Comments