किनवट,दि.४ : आगामी नगरपरिषद, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने किनवट येथे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. या मुलाखती दिनांक ६ नोव्हेंबर २०२५ रोजी, किनवट येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात (रेल्वेस्टेशन रोड, पंचायत समिती कार्यालयासमोर) आयोजित केल्या जाणार आहेत.
ही मुलाखत लोकनेते आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर आणि जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर यांच्या सूचनेनुसार घेण्यात येत असून, किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक व प्रमुख पदाधिकारी या बैठकीस उपस्थित राहणार आहेत.
मुलाखतीदरम्यान इच्छुक उमेदवारांच्या आतापर्यंतच्या कार्याचा आढावा घेण्यात येईल. स्थानिक जनतेच्या प्रश्नांवर, पक्ष संघटनेच्या बळकटीकरणावर आणि आगामी निवडणूक धोरणावरही सविस्तर चर्चा केली जाणार आहे.
पक्षनिष्ठा, सामाजिक बांधिलकी आणि जनसेवेचा अनुभव असलेल्या उमेदवारांनाच संधी देण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा ठाम निर्धार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीस प्रमुख उपस्थिती म्हणून
डॉ. उत्तमराव सोनकांबळे (पक्ष निरीक्षक), शिवाजीराव पाटील लगळुदकर, वैजेनाथ करपुडे पाटील (विधानसभा अध्यक्ष), बाळू पवार (तालुकाध्यक्ष), संजय सिडाम (जिल्हा उपाध्यक्ष), प्रवीण घुले (जिल्हा सचिव) तसेच अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
किनवट तालुक्यातील सर्व इच्छुक कार्यकर्त्यांनी या मुलाखतीस उपस्थित राहावे, असे आवाहन पक्षातर्फे करण्यात आले आहे.
Post a Comment
0 Comments