नांदेड : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संघटन मजबूत करण्यासाठी नव्या नियुक्त्या सुरू केल्या आहेत. त्या अनुषंगाने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इंजि. स्वप्निल इंगळे पाटील यांची माहूर तालुका पक्ष निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
ही नियुक्ती जिल्ह्याचे लोकनेते तथा लोहा-कंधार मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस उत्तर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब रावणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याची माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली आहे.
इंजि. स्वप्निल इंगळे पाटील यांच्या नियुक्तीमुळे माहूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक बळकट होईल, असा विश्वास स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त केला जात आहे.

Post a Comment
0 Comments