मुंबई, दि. २४ : लॉर्ड बुद्धा टिवीच्या १६ व्या वर्धापन दिनानिमित्त संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला ‘सन्मान यांचा... जागर संविधानाचा...’ हा भव्य सांस्कृतिक सोहळा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नरीमन पॉइंट येथे बुधवारी (दि. २६ नोव्हेंबर) सायं. ६ वाजता रंगणार आहे. सारेगामापा फेम गायिका छाया-आकांक्षा यांच्या बुद्ध-भीम प्रेरणादायी गीतांचा लाईव्ह इन कॉन्सर्ट हा कार्यक्रमाचा मुख्य आकर्षण असणार आहे.
कार्यक्रमाला भदंत हर्षबोधी (बोधगया विहार), मा. राजकुमारजी बडोले (आमदार व माजी सामाजिक न्याय मंत्री), मा. सिद्धार्थ खरात (आमदार, मेहकर-लोणार), विजय (भाई) गिरकर (माजी मंत्री- म.रा.) हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
तसेच यदुभाऊ जोशी (राजकीय संपादक, लोकमत), मा. यामिनी ताई जाधव (भीमकन्या, माजी आमदार भायखळा), आयु. दीपक कदम (प्रमुख, आंबेडकरवादी मिशन) आणि सुनील गायकवाड (माजी खासदार, लातूर) मान्यवरांची उपस्थिती कार्यक्रमाला लाभणार आहे.
या कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून सचिन मून, जयेश वाकोडे, सुम्मीत खोब्रागडे, किशोर दानी, बाळासाहेब बेंगळे, राजेश खिल्लारे, उत्तम इंगळे यांच्यासह अनेक समाजसेवी कार्यकर्ते पुढाकार घेत आहेत.
संविधान मूल्यांची जागरूकता आणि बुद्ध-भीम विचारांची सांस्कृतिक परंपरा जपण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
