किनवट : लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सध्या अनेक आव्हानं उभी ठाकली आहेत. सामाजिक, शासकीय तसेच राजकीय स्तरावर पत्रकारांना अनेकदा अन्यायकारक वागणुकीला, मानसिक छळास, शिवीगाळीस आणि अगदी मारहाणीपर्यंतही सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत पत्रकारांनी संघटित होऊन आपल्या न्यायहक्कांसाठी एकजुटीने लढा देणे ही काळाची गरज बनली आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ या प्रतिष्ठित संघटनेची किनवट तालुका कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. ही कार्यकारिणी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष रुपेश पडमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा कार्यकारिणीच्या संमतीने नुकतीच नियुक्त करण्यात आली.
स्थानिक पत्रकारांच्या एकमुखी मागणीनुसार, किनवट तालुक्यातील युवा पत्रकार आणि सिनेअभिनेते लक्ष्मीकांत मुंडे यांची तालुकाध्यक्षपदी, तर सम्यक सर्पे यांची सचिवपदी निवड करण्यात आली.
याशिवाय उपाध्यक्षपदी मारोती देवकते आणि विनोद पवार, सहसचिवपदावर शेख शौकत आणि बापूराव वावळे, कोषाध्यक्षपदी रुपेश नागरुलवार, सहकोषाध्यक्षपदी अनि
निवडीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना तालुकाध्यक्ष लक्ष्मीकांत मुंडे म्हणाले की,
“गत काही वर्षांत पत्रकारांवर होणारी प्रताडणा आणि मानहानी आता सहन केली जाणार नाही. समाजातील प्रश्न शासनापर्यंत पोहोचवणे हे आमचे कर्तव्य आहे, आणि शासनाचे निर्णय जनतेपर्यंत पोहोचवणे ही जबाबदारी. या प्रक्रियेत जर पत्रकारांशी अन्याय झाला, तर आम्ही संघटितपणे त्याविरोधात ठाम आवाज उठवू.”

Post a Comment
0 Comments