किनवट : नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने प्रचाराच्या रणशिंग फुंकत जंगी शक्तिप्रदर्शनाची तयारी केली असून, पक्षाचे युथ आयकॉन सुजात दादा आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवार, दि. २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता दुर्गा मैदान, किनवट येथे विशाल जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
नगराध्यक्ष पदासाठी वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार शाहेदा शेख शब्बीर यांच्या समर्थनार्थ ही सभा होत असून, पक्षाच्या सर्व उमेदवारांसाठी ही सभा निर्णायक ठरणार असल्याचे पक्ष कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
सभेत नगर परिषदेच्या विविध प्रभागांमधील अधिकृत उमेदवारांचा परिचय करून देण्यात येणार असून, त्यात पुढील उमेदवारांचा समावेश आहे :
- प्रभाग क्र. २ (ब) : मोहम्मद अली काहार खान
- प्रभाग क्र. ४ (अ) : संगीता नामदेव कनिंदे
- प्रभाग क्र. ६ (अ) : अरसलान अकबर खान
- प्रभाग क्र. १० (ब) : पुष्पलता माधवराव मुनेश्वर
किनवट शहरातील बदलाच्या राजकारणाचा नवा अध्याय या सभेतून सुरू होणार असून, स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये या सभेबाबत उत्सुकता आणि उत्साह पाहायला मिळत आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन निखिल वाघमारे (ता.अध्यक्ष), सुरेश मुनेश्वर, प्रविण गायकवाड, दूधराम राठोड, दीनेश कांबळे, राहुल चौदंते, सुधकार हलवले, शेख याकुब आणि विशाल जोंधळे यांनी केले आहे.