अंबाजोगाई : मराठवाडा नवनिर्माण लोकायत (मानवलोक), यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण शाखा अंबाजोगाई आणि मानवलोक समाजकार्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय संविधान दिनानिमित्त तसेच स्वातंत्र्यसैनिक आणि ज्येष्ठ समाजवादी नेते साथी सदानंद वर्दे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून आणि मानवलोक संस्थेचे संस्थापक डॉ. द्वारकादासजी लोहिया (बाबुजी) यांच्या सहावा स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
या व्याख्यानमालेत ‘कृत्रिम बुद्धिमत्ता : ताकद, मर्यादा आणि आव्हाने’ या विषयावर एम.के.सी.एल.चे संचालक मा. विवेक सावंत मार्गदर्शन करणार असून डॉ. बी. आय. खडकभावी, प्राचार्य टी.बी. गिरवलकर इंजिनीअरिंग कॉलेज, अंबाजोगाई हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.
हा कार्यक्रम बुधवार, दि. २६ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी २.३० वाजता अॅड. भगवानदासजी लोहिया कल्याण मंडपम, मानवलोक रिंगरोड, अंबाजोगाई येथे होणार आहे. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे, असा विनम्र आग्रह श्री. अनिकेत लोहिया (कार्यवाह, मानवलोक, अंबाजोगाई) व डॉ. प्रकाश जाधव (प्राचार्य, मानवलोक समाजकार्य महाविद्यालय, अंबाजोगाई) यांनी केला आहे.
Tags
||महाराष्ट्र||

