Type Here to Get Search Results !

१० नोव्हेंबरला ‘संविधान क्रांती महामोर्चा'

 नांदेड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणाऱ्या अनिल मिश्रा याला अटक करावी, या प्रमुख मागणीसह विविध सामाजिक व राजकीय प्रश्नांवर तोडगा निघावा यासाठी संविधान संरक्षण समितीतर्फे १० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता ‘संविधान क्रांती महामोर्चा’ काढण्यात येणार आहे. हा मोर्चा आयटीआय चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.

या मोर्चात ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेद्वारे निवडणुका घ्याव्यातजातनिहाय जनगणना करावीआरएसएसवर बंदी आणावीभांडवलदारांच्या नफेखोरीला आळा घालावासरकारी आस्थापनांचे खासगीकरण थांबवावे, तसेच समाजकल्याण खात्याचा निधी इतर योजनांसाठी वळवू नये, अशा मागण्या करण्यात येणार आहेत.

महामोर्चात सहभागी होण्याचे आवाहन डॉ. अनंत राऊत, रमेश सोनाळे, मनीष कावळे, तुकाराम टोम्पे, व्ही. आर. असोरे, दत्ताभाऊ तुमवाड, डॉ. ना. तु. खंदारे, डॉ. राजेश्वर पालमकर, किशन फोले आणि भारत कानिंदे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments