किनवट, ता.५ : किनवट नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज(ता.१५) मोठ्या प्रमाणात नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आलेत. उमेदवारांच्या गर्दीमुळे नगर परिषद कार्यालय परिसर राजकीय वातावरणाने तापला होता. नगराध्यक्ष पदासाठी ४ अर्ज, तर नगरसेवक पदासाठी तब्बल ४२ अर्ज दाखल झाल्याने लढत अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत.
||नगराध्यक्षपदासाठी चौघांची एन्ट्री||
नगराध्यक्षपदासाठी अनुजा किरणकुमार नेम्मानीवार, रमना अनिल तिरमनवार, शाहेदा शबीर शेख आणि सुहासिनी श्रीनीवास नेम्मानीवार या चार उमेदवारांनी आज(ता .१५)अर्ज दाखल केले आहेत. या पदासाठी पहिल्याच टप्प्यात चुरशीचे चित्र दिसून आले आहे.
||नगरसेवक पदासाठी प्रभागनिहाय उमेदवारीचा पाऊस||
शहरातील सर्व १० प्रभागांमधून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. अनेक प्रभागांतून बहुरंगी स्पर्धा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही उमेदवारांनी २ अर्ज दाखल करीत आपली दावेदारी मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रभाग १ (अ) : कुमरे शोभा गणपतराव व मरस्कोल्हे संतोष भिमराव
प्रभाग १ (ब) : नडपेल्लीवार प्रीती रामरत्न व नेम्मानीवार सौम्या व्यंकट
प्रभाग २ (अ) : भंडारे स्वाती नरेश, अनेलवार अनुसया मधुकर व जागर्लावार अश्विनी आदर्श
प्रभाग २ (ब) : काटोटे वजाहत एकबाल, शेख खलील शेख खाजा, कदम बाळकृष्ण देवराव व कदम वंदना बाळकृष्ण
प्रभाग ३ (अ) : दारगुलवार अंजली राहुल
प्रभाग ३ (ब) : सिरमनवार नरेद्र मुकुंदराव, तिरमनवार जगदीश भगवानराव व दोनपेल्लीवार लक्ष्मीपती बापूराव
प्रभाग ४ (अ) : रायबोळे संदीप सुभाष, गिमेकर सुभाष भीमराव व नगराळे अभय मधुकर
प्रभाग ४ (ब) : सुरावार वर्षा रविंद्र व सभा परवीन शेख नूर
प्रभाग ५ (अ) : बोलचेट्टीवार गजानन गंगय्या
प्रभाग ५ (ब) : पवार कमल साहेबराव, तिरमनवार लक्ष्मीबाई लच्छना व कोरडे प्रशांत सुरेशराव
प्रभाग ६ (अ) : राठोड प्रविण इंद्रसिंग (२ अर्ज), बिराजदारी सतिश माणिकराव व जयस्वाल शरद मोहनलाल
प्रभाग ६ (ब) : पोहरकर भारती प्रमोद, चमणबार रुक्माबाई हनमलु व परेकर गंगुबाई कचरु
प्रभाग ७ (अ) : मारपवार त्रिशला भगवान, मुनेश्वर ललिताबाई मारोती व नगराळे ज्योती सुगत
प्रभाग ७ (ब) : नेम्मानीवार श्रीनीवास किशनराव
प्रभाग ८ (ब) : सातुरवार सूरज किशनराव
प्रभाग ९ (अ) : शेख सादीक इमरान
प्रभाग ९ (ब) : कुरेशी तौफिक अहमद हसन (२ अर्ज)
प्रभाग १० (अ) : राठोड वंसत रंगराव
प्रभाग १० (ब) : अजमा अर्जुम शेख सय्यद (२ अर्ज)
नगर परिषद कार्यालय परिसर राजकीय चाहुलींनी गजबजला
आज उमेदवार व समर्थकांच्या वर्दळीमुळे नगर परिषद कार्यालय परिसरात वातावरण उत्साहपूर्ण दिसत होते. समर्थकांच्या घोषणा, गटांची धावपळ आणि अचानक उमेदवारी दाखल करणाऱ्यांमुळे राजकीय समीकरणांमध्ये अनेक बदल जाणवत होते.
सोमवारी (ता.१७) दुपारी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहेत.
त्यानंतर छाननी, अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आणि उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होईपर्यंत प्रतिक्षेचे वातावरण राहणार आहे.
किनवटच्या निवडणुकीची लढत यंदा अधिक रंगतदार आणि चुरशीची ठरणार हे निश्चित!


Post a Comment
0 Comments