महाड : “चलो महाड... चलो महाड...” या घोषणांनी पुन्हा एकदा महाडच्या ऐतिहासिक भूमीला जागविण्याची वेळ आली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्यावर आणि त्यांच्या खुल्या पत्रावर आधारित, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) आपला ६८ वा वर्धापन दिन साजरा करीत आहे.
हा ऐतिहासिक सोहळा ३ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता रायगड जिल्ह्यातील महाड क्रांतिभूमी, चांदे मैदान येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे भूषविणार आहेत.
पक्षाचे प्रमुख मार्गदर्शक महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या विचारांचे अनुयायी R.P.I. (आठवले) या प्रसंगी सामाजिक न्याय, बंधुता आणि समतेचा संदेश पुन्हा एकदा जनमानसात रुजविणार आहेत.
महाड या क्रांतीभूमीवर होणारा हा सोहळा केवळ पक्षाचा वर्धापन दिन नसून, आंबेडकरी विचारसरणीचे पुनः स्मरण आणि समाजजागृतीचा नवा संकल्प ठरणार आहे.

Post a Comment
0 Comments