शिष्यवृत्ती वाटप सोहळा २५ नोव्हेंबरला संविधान दिनानिमित्त धायरीत प्रेरणादायी कार्यक्रमं


पुणे(धायरी) :
 संविधान दिन आणि विंग कमांडर अभय जोशी स्मृतिदिनाचे औचित्य साधत धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान, एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन व जतन फाउंडेशन फॉर इंक्लूजन यांच्या संयुक्त विद्यमाने “विंग कमांडर अभय जोशी आरोग्य व शिक्षण निधी अंतर्गत शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रम” आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम दि. २५ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत राजमाता जिजाऊ मासाहेब सभागृह, धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान, धायरी येथे होणार आहे.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लेखक, कवी व आरोग्य अभ्यासक  डॉ. प्रदीप आवटे, सामाजिक कृतज्ञता निधीचे कार्याध्यक्ष  सुभाष वारे व निधीच्या प्रवर्तक  ज्योतीताई जोशी उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष  सोपान ऊर्फ काका चव्हाण असतील.

निमंत्रकांमध्ये अनिकेत सोपान (काका) चव्हाण (संचालक – धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान), प्राचार्य सुजाता कडू (धारेश्वर इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग) आणि रविंद्र झेडे (संचालक – जतन फाउंडेशन फॉर इंक्लूजन) यांचा समावेश आहे.

शिक्षणात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या आणि आर्थिकदृष्ट्या मर्यादित विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व आधार देण्यासाठी ही शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा व सामाजिक भान वृद्धिंगत करणारा हा कार्यक्रम ठरणार असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
आमच्याशी संपर्क करा