नागपूर : रिपब्लिकन फेडरेशनतर्फे संविधान चौक, नागपूर येथे “सामाजिक एकता महोत्सव” आयोजित करण्यात आला असून, आंबेडकरवादी राजकारणाची पुनर्रउभारणी व सामाजिक-आर्थिक समतेच्या दिशा ठरविण्याच्या दृष्टीने हा महोत्सव एक महत्त्वपूर्ण उपक्रम ठरणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी States and Minorities तसेच भारतीय राज्यघटनेतील राज्याच्या धोरण निर्देशक तत्वांमधून मांडलेल्या कल्याणकारी व आर्थिक समतेच्या संकल्पनांचा आजच्या काळात कसा उपयोग करायचा, यावर या महोत्सवात मार्गदर्शन केले जाणार आहे.
१६ ते १८ नोव्हेंबर २०२५, दररोज दुपारी ४ ते सायं. ७ दरम्यान होणाऱ्या या कार्यक्रमात प्रथम सांस्कृतिक कार्यक्रमानंतर प्रबोधनात्मक व्याख्याने होतील.
पहिल्या दिवशी अर्थात १६ नोव्हेंबरला प्रख्यात अर्थतज्ज्ञ जाँ ड्रेझ “भारत आणि इतर देशातील आरोग्य व्यवस्था” या विषयावर भाष्य करतील.
दुसऱ्या दिवशी, १७ नोव्हेंबरला जेएनयूसचे अर्थतज्ज्ञ प्रा. अरुण कुमार “भारत व विकसित-विकसनशील देशांतील शिक्षणविषयक आर्थिक तरतुदीची तुलना” मांडतील.
तिसऱ्या दिवशी, १८ नोव्हेंबरला बँक व वित्त तज्ज्ञ विश्वास उटगी “आजची वित्तीय भांडवलशाही” या गंभीर विषयावर मार्गदर्शन करतील.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मिलिंद पखाले, मुख्य संयोजक, रिपब्लिकन फेडरेशन असून अनेक संयोजक, सहसंयोजक व मार्गदर्शकांच्या संयुक्त प्रयत्नातून हा उपक्रम साकारला आहे. सामाजिक सलोखा, बंधुता व आर्थिक समतेसाठी नव्या धोरणांची आखणी करण्याचा प्रयत्न असलेल्या या महोत्सवाकडे नागपूरकरांचे लक्ष लागले आहे.
Post a Comment
0 Comments