Type Here to Get Search Results !

"सामाजिक एकता महोत्सव" — आंबेडकरवादी विचारांच्या पुनर्रउभारणीचा महामंच नागपूरात!

 



नागपूर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेल्या “States and Minorities” या ऐतिहासिक ग्रंथातील आणि Directive Principles of State Policy मधील कल्याणकारी तसेच आर्थिक समतेच्या विचारांची पूनर्रउभारणी करण्याच्या उद्देशाने “रिपब्लिकन फेडरेशन” तर्फे “सामाजिक एकता महोत्सव” आयोजित करण्यात आला आहे.

हा महोत्सव रविवार, १६ नोव्हेंबर ते मंगळवार, १८ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत संविधान चौक, नागपूर येथे होणार असून, दररोज दुपारी ४ ते सायं. ७ वाजेपर्यंत विविध सांस्कृतिक आणि प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्षपद मिलिंद पखाले, मुख्य संयोजक, रिपब्लिकन फेडरेशन हे भूषवणार आहेत.


• महोत्सवाचा कार्यक्रम तपशील :

📅 रविवार, १६ नोव्हेंबर २०२५ — पहिला दिवस
🔹 विषय: भारत आणि इतर देशातील आरोग्य व्यवस्था
🔹 प्रमुख वक्ते: जाँ ड्रेझ, प्रख्यात अर्थतज्ज्ञ, रांची

📅 सोमवार, १७ नोव्हेंबर २०२५ — दुसरा दिवस
🔹 विषय: भारत आणि विकसित व विकसनशील देशातील शिक्षणविषयक आर्थिक तरतुदीची तुलना
🔹 प्रमुख वक्ते: प्रा. अरुण कुमार, अर्थतज्ज्ञ, जे. एन. यू., दिल्ली

📅 मंगळवार, १८ नोव्हेंबर २०२५ — तिसरा दिवस
🔹 विषय: आजची वित्तीय भांडवलशाही
🔹 प्रमुख वक्ते: विश्वास उटगी, बँक व वित्तीय तज्ञ, मुंबई


प्रत्येक सत्राची सुरुवात प्रेरणादायी सांस्कृतिक कार्यक्रमांपासून होईल, त्यानंतर देशातील नामवंत अर्थतज्ज्ञांचे प्रबोधनात्मक व्याख्यान होणार आहे.

या महोत्सवाचे सह संयोजक म्हणून छाया खोब्रागडे, नरेश वाहणे, विशाल वानखेडे, नरेंद्र धनविजय, ज्योती आवळे, सुधीर मेश्राम, भारती सहारे आदींचा समावेश आहे.

तर मार्गदर्शक मंडळात सुनिल सारिपुत्त, राहुल सोमकुवर, डॉ. सुरेंद्र वोरकर, प्रकाश दार्शनिक, नानाजी गायकवाड, पुष्पा वौद्ध, शार्दुला महाजन, रंजनाताई वासे, जयत इंगळे, रजनीश मेश्राम यांसारखे अनुभवी व्यक्तिमत्व मार्गदर्शन करणार आहेत.


“Parliamentary Democracy is the Best Form of Government”

या डॉ. आंबेडकरांच्या वचनाला प्रेरणा मानून, आर्थिक व सामाजिक समतेच्या वाटचालीसाठी “सामाजिक एकता महोत्सव” हा महोत्सव नव्या विचारांना दिशा देणारा आणि आंबेडकरवादी राजकारणाच्या पुनर्रउभारणीसाठी ऐतिहासिक ठरणार आहे.


नागरिक, युवक आणि विचारप्रेमी यांना उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.



Post a Comment

0 Comments