Type Here to Get Search Results !

किनवट नगरपरिषदेच्या सत्तेची किल्ली २८ हजार मतदारांच्या हाती

 किनवट : आगामी नगरपरिषद निवडणुकीत एकूण २८ हजार ४५४ मतदार शहरातील नवे लोकप्रतिनिधी ठरविणार आहेत. यंदा १० प्रभागांतून थेट जनतेतून नगराध्यक्ष आणि २१ नगरसेवक निवडले जाणार आहेत.

पूर्वी किनवट शहरातील छोटे छोटे वॉर्ड असत, ज्यात सरासरी ७०० च्या आत मतदारसंख्या होती. मात्र, आता या वॉर्डांचे प्रभागांमध्ये रूपांतर झाल्याने मतदारसंख्या तिपटीहून अधिक झाली आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक उमेदवारांसाठी अधिक आव्हानात्मक ठरणार आहे.

सन २०११ च्या लोकसंख्येनुसार प्रभागनिहाय मतदारसंख्या पुढीलप्रमाणे आहे :

  • प्रभाग क्र. १ : २,६८३
  • प्रभाग क्र. २ : २,६५३
  • प्रभाग क्र. ३ : २,७८५
  • प्रभाग क्र. ४ : २,६०३
  • प्रभाग क्र. ५ : २,५८९
  • प्रभाग क्र. ६ : २,७४२
  • प्रभाग क्र. ७ : २,६६६
  • प्रभाग क्र. ८ : २,६८९
  • प्रभाग क्र. ९ : २,८०२
  • प्रभाग क्र. १० : ४,२४२ (सर्वाधिक)

प्रभागनिहाय मतदारसंख्या वाढल्याने प्रत्येक मतदाराशी संपर्क ठेवण्यासाठी उमेदवारांना मोठी कसरत करावी लागणार आहे. शहरातील सर्वच राजकीय इच्छुकांनी मतदारसंघात भेटीगाठींचा धडाका लावला असून, निवडणुकीच्या रणसंग्रामाला सुरुवात झाल्याचे चित्र दिसत आहे.


Post a Comment

0 Comments