किनवट,दि.२५ : समता, बंधुता व न्याय यांचा संदेश देणारे भारतीय संविधान निर्माता विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ‘युवा पॅंथर’ तर्फे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे २६/११ मुंबई आतंकी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस व वीर-जवानांना रक्तदान करून अभिवादन करण्याचा अभिनव उपक्रम यंदा राबविण्यात येत आहे.
हे शिबीर शुक्रवार, दि. ६ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, किनवट येथे आयोजित करण्यात आले असून, अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. “रक्तदान म्हणजे जीवनदान” या भावनेतून समाजातील प्रत्येक घटकाला रक्तदानासाठी पुढे येण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
या उपक्रमाचे आयोजक अॅड. सम्राट सर्पे आणि निखिल वि. कावळे असून समस्त आंबेडकरप्रेमी किनवट यांनी त्यात सक्रिय सहभाग नोंदविला आहे.
शिबीरासंदर्भात अधिक माहितीसाठी 8668700748, 8975630290, 7588430296, 7770059459 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असेही आवाहन आयोजकांनी केले आहे.डॉ. आंबेडकरांना कृतिशील अभिवादन आणि शहीद जवानांना रक्तदानातून अभिवादन, असा आदर्श उपक्रम या निमित्ताने राबविण्यात येत असल्याने समाजातून कौतुक व्यक्त होत आहे. अधिकाधिक युवकांनी पुढे येऊन रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे

