नवी दिल्ली, दि.२१ : खासदार स्वीय सहाय्यक तसेच ग्रामपंचायत दिग्रस (ता.किनवट) चे उपसरपंच कर्तार साबळे यांनी आज रेल भवन, नवी दिल्ली येथे माननीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन नंदीग्राम एक्सप्रेस (मुंबई–बल्लारशा–मुंबई) या गाडीला LHB रेक जोडण्याची औपचारिक मागणी केली.
सध्या नंदीग्राम एक्सप्रेसमध्ये वापरले जाणारे ICF कोच जुने, क्षमतेने मर्यादित असून प्रवासादरम्यान धक्के, आवाज, सुरक्षा धोक्यांचा संभव आणि प्रवाशांना भेडसावणाऱ्या असुविधा याबाबत निवेदनात तपशीलवार उल्लेख करण्यात आला. आधुनिक तंत्रज्ञानाच्या LHB कोचमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, आरामदायी व विश्वासार्ह होणार असल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे.
नंदीग्राम एक्सप्रेस ही विदर्भ, मराठवाडा आणि मुंबई विभागातील जिल्यांना जोडणारी महत्त्वाची जीवनवाहिनी असून, दररोज हजारो प्रवासी या गाडीवर अवलंबून आहेत. त्यामुळे या गाडीचे आधुनिकीकरण तातडीने आवश्यक असल्याचा ठाम आग्रह कर्तार साबळे यांनी मंत्रीमहोदयांसमोर मांडला.
रेल्वे मंत्रालयाने या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.
![]() |


Post a Comment
0 Comments