किनवट,ता.१: धरती आबा बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त नंदगाव(ता.किनवट) येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आदिवासी परंपरा, संघर्ष आणि स्वाभिमानाची ज्योत पेटवणाऱ्या या महान योद्ध्याच्या स्मरणार्थ परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नंदकिशोर डुकरे यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून जनाबाई डुडूळे (माजी जिल्हा परिषद अध्यक्षा, नांदेड) तसेच जयवंत वानोळे यांनी उपस्थिती दर्शविली. प्रमुख वक्ते म्हणून प्रा. रामराव देशमुखे यांनी बिरसा मुंडा यांच्या क्रांतिकारी विचारांचे महत्व स्पष्ट केले. त्यांच्यासह लक्ष्मण कुरुडे, एकनाथ बुरकुले आदींचेही मार्गदर्शन झाले.
प्रमुख अतिथी म्हणून डॉ. आशिष डुडूळे, डॉ. सुभाष वानोळे, निर्गुण पाटील, शामराव भुरके , माधव वानोळे , कॉ. शेषराव ढोले, किशन मिराशे, गणपत किरवले , डॉ. गणपत डुकरे यांची उपस्थिती राहिली. कुपटीचे सरपंच श्री. शिवाजी भुरके, नंदगावचे सरपंच श्री. युवराज भंडगे, धानोऱ्याचे पो. पाटील श्री. लक्ष्मण देशमुखे आणि नंदगावचे पो. पाटील श्री. विजय देशमुखे यांनीही कार्यक्रमास हजेरी लावली. श्री. प्रभाकर बोडेवाड व श्री. बापुराव वानोळे यांचीही सक्रिय उपस्थिती होती.
प्रास्ताविक प्रा. सोमनाथ खुडे यांनी केले. सूत्रसंचालन श्री. राजकुमार तरटे यांनी, तर आभार प्रदर्शन श्री. गंगाराम खुडे यांनी केले.
कार्यक्रमाला परिसरातील व गावातील कट्टर बिरसा क्रांतिदलातील युवक, महिला आणि समाजबांधवांची मोठी उपस्थिती लाभली. संपूर्ण कार्यक्रमात आदिवासी ओळखीचा अभिमान, इतिहासाचे स्मरण आणि एकात्मतेची भावना ओतप्रोत भरलेली दिसली.
