छत्रपती संभाजीनगर : भारतीय संविधान दिन आणि संविधान अंमलबजावणी दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ७ डिसेंबर रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात संविधान जनजागरण परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या २५ नोव्हेंबर १९४९ च्या भाषणातील चेतावणी—
“सार्वभौम स्वातंत्र्य पुन्हा गमावले तर ते मिळणार नाही”—या जाणिवेवर परिषदेत विशेष भर दिला जाणार आहे.
जात-पंथांच्या भिंती ओलांडून संविधानिक मूल्यांची पुनर्स्थापना आणि लोकशाही दृढ करण्याचा संदेश या परिषदेतून दिला जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
कार्यक्रमासाठी अॅड. महमूद प्राचा, अॅड. प्रकाश परांजपे, मा. निरंजन टकले, अॅड. स्मिता कांबळे, इंजि. अशोक येरेकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
दुपारी १२.३० वा. होणारी ही परिषद ‘आम्ही भारताचे लोक’ या संविधानप्रिय नागरिकांच्या ऐक्याचे प्रतीक ठरणार आहे.
