किनवट, दि.५ : शेतकऱ्यांच्या उत्पादनाला स्थिर बाजारपेठ मिळावी आणि पिकांना हमीभावाची सुरक्षा मिळावी, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळामार्फत राज्यभर हमीभाव खरेदी केंद्रांची उभारणी केली जात आहे. त्याच अनुषंगाने इस्लापूर येथे सुरू करण्यात आलेल्या हमीभाव सेवा खरेदी केंद्राचे उद्घाटन मंगळवारी (दि.३) आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते झाले.
या खरेदी केंद्रावर उडीद, सोयाबीन आणि मुग या प्रमुख पिकांची शेतकऱ्यांकडून खरेदी केली जाणार असून, शासनाने निश्चित केलेल्या निकषांनुसार शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणीसह सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे बंधनकारक आहे. संपूर्ण खरेदी प्रक्रिया गोकुळ कृष्णा अॅग्रो प्रॉडक्ट कंपनीमार्फत राबविण्यात येणार असल्याची माहिती केंद्रप्रमुख शिवम जन्नावार आणि सचिव प्रशांत श्रीमनवर यांनी दिली.
उद्घाटनानिमित्त इस्लापूर येथील शेतकरी अमोल राम लाभशेटवार यांच्या ४१ किलो सोयाबीनची पहिली खरेदी करून केंद्राच्या कामकाजाला औपचारिक सुरुवात करण्यात आली.
या प्रसंगी आ. केराम यांच्यासह दिनकर दहिफळे, सूर्यकांत आरडकर, बालाजी आलेवार, भगवानराव हुरदुके, कपिल करेवाड, तुकाराम बोनगीर, सरपंच शेख अब्दुल रब, परमेश्वर पेशवे, काशिनाथ शिंदे, गंगाराम गडमवाड, गौतम कांबळे, स्वप्नील गरडे, संतोष जाधव (शिवणी), संदीप वानखेडे, रवी कसबे, बालाजी काळे, ओम पाटील, डॉ. भगवान गंगासागर, सत्येश्वर पेशवे, सुदर्शन पाटील, सचिन पाटील, शिवशंकर मेळेगावकर, विकास माहुरकर आणि स्वीय सहाय्यक बंटी फड यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
इस्लापूर येथील व्यापारी दत्तात्रय पलीकौडंवार, चंद्रकांत बीजमवार, नवीन मामीडवार तसेच परसराम फोले, दिगंबर करेवाड, राजेंद्र पाटील घोगरे, प्रकाश करेवाड, रमेश बोटेवाड, गोविंद भोयर, अनिल पाटील, देवानंद गिरी आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
