मुंबई : राज्यातील सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल २१ डिसेंबर रोजी एकत्रित जाहीर करावेत, असा महत्त्वपूर्ण आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. न्यायालयाने २० डिसेंबरपर्यंत आचारसंहिता लागू राहील आणि त्या कालावधीत एक्झिट पोल प्रसिद्ध करता येणार नाही, हेही स्पष्ट केले.
दोन दिवसांपूर्वी राज्य निवडणूक आयोगाने काही नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. दरम्यान, आज राज्यातील अनेक ठिकाणी मतदान पार पडत असून, निकाल उद्या जाहीर होणार होते. मात्र, न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर आता हे निकाल २१ डिसेंबरला जाहीर होतील.
निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक राहावी आणि पुढील निवडणुकांवर होणारा संभाव्य परिणाम टाळावा, या उद्देशाने निकाल पुढे ढकलण्याबाबत दाखल याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
Tags
||महाराष्ट्र||
