किनवट, दि. २ : लोकशाहीच्या सशक्तीकरणात सर्वसमावेशक सहभागाची नवी नोंद करत जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळा नयाकॅम्प, किनवट येथील मतदान केंद्रावर तृतीयपंथी मतदार शिवन्या राजू कोटलवार यांनी अभिमानाने मतदानाचा हक्क बजावला.
मतदान प्रक्रियेदरम्यान तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शारदा चौंडेकर, मुख्याधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विवेक कांदे, गट शिक्षणाधिकारी तसेच मतदार जनजागृती (स्वीप) कक्षाचे नोडल अधिकारी अनिलकुमार महामुने, तसेच मास्टर ट्रेनर व स्वीप सदस्य उपस्थित होते.
मतदानासाठी आलेल्या नागरिकांनीही उत्साहाने रांगेत उभे राहून लोकशाही प्रक्रियेत सहभाग नोंदवला.
ही घटना तृतीयपंथी समाजाच्या राजकीय सहभागाचे महत्त्व अधोरेखित करणारी ठरली असून, मुक्त आणि समताधिष्ठित निवडणूक प्रक्रियेसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरते.
Tags
||जिल्हा|

