किनवट ,दि.२ : नांदेड येथे नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यांच्या नुकत्याच आयोजित नॅशनल अबॅकस स्पर्धेत सेवा प्रोॲक्टीव्ह अबॅकस क्लासेस, गोकुंदा येथील विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी केली आहे. सदर स्पर्धेत ४७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता, त्यापैकी २० विद्यार्थ्यांनी ट्रॉफी आणि २१ विद्यार्थ्यांनी पदक जिंकून संघाचा अभिमान वाढवला.
||ट्रॉफी विजेते विद्यार्थी:||
स्मरण हरिश नेम्मानीवार, सिंड्रेला राहुल घुले, मृण्मय महेंद्र एडके, अंश माधव दबडे, सुनिधी सुनिल फोले, इश्वरी मंगेश बाबर, इलियास वशिम शेख, विरा रंजित पवार, रेनाक्षी गणपत मुनेश्वर, श्रीनिवास लहु गुरमे, युग किशोर जाधव, आराध्या गजानन दबडे, श्रेयश नारायण चंदनकर, भावेश सतिश चव्हाण, ममता माधव चव्हाण, संस्कृती गजानन आलेवार, पार्थ अशिष डगवाल, माही मनिषा शिंदे, विधी नरेंद्र कानिंदे, वैशाली दिंगाबर खुपसे
||पदक विजेते विद्यार्थी:||
युगाक्षी गणेश वाठोरे, स्वराज बालाजी आमले, आयुष नंदकुमार बाभुळकर, शिव पुंडलिक दबडे, आरुष सतीश नरवाडे, संकल्प सुनिल येल्मेडवाड, अन्वीका अनुप नेम्मानीवार, श्रेया राजू गुरुनुले, आरुष रुखमाजी धुमाळे, माही माधव दराडे, वेदांती चंद्रकांत घुगे, तनिष्क श्याम डगवाल, अर्णव राजशेखर नार्लावार, सार्थक कुणाल राठोड, तक्षक प्रविण वाठोरे, तेजस्विनी संदिप कागणे, अरुन संजय पवार, पवन राम बावने, स्पंदना सुनिल येल्मेवाड, सम्यक सतिश नरवाडे, श्वेता वंसतराव राठोड सेवा प्रोॲक्टीव्ह अबॅकस क्लासेसचे संचालक सुरेश जाधव यांना “बेस्ट सेंटर” या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रशिक्षक कांचन रतनवार, प्रतिक्षा तोडसाम, मोहिनी इबितवार आणि सृष्टी शेंडे यांनी विद्यार्थ्यांना उत्कृष्ट प्रशिक्षण दिल्यामुळे हा यशस्वी परिमाण मिळाला. या स्पर्धेत पाच जिल्ह्यांमधून शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते.आता २० विद्यार्थी स्टेट लेवल स्पर्धेसाठी निवडले गेले असून, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पुणे येथे महाराष्ट्रभरातील विद्यार्थ्यांशी स्पर्धा होणार आहे.
Tags
||जिल्हा||


