सिन्नर : रेल्वे आंदोलनाच्या विस्तारासाठी सिन्नर येथे सर्वपक्षीय नेते, उद्योजक, कामगार प्रतिनिधी आणि पत्रकारांची व्यापक बैठक पार पडली. या बैठकीला सत्यजितजी तांबे यांची प्रमुख उपस्थिती होती, तर कामगार चळवळीतील नेते अजित नवले यांनी मार्गदर्शन केले.
बैठकीत रेल्वे संदर्भातील प्रलंबित प्रश्न, प्रवासी व कामगारांच्या अडचणी, तसेच परिसराच्या औद्योगिक व आर्थिक विकासासाठी रेल्वे सुविधांची आवश्यकता यावर सखोल चर्चा झाली. आंदोलन अधिक संघटित आणि प्रभावी करण्यासाठी सर्वपक्षीय समन्वय, जनजागृती कार्यक्रम, तसेच पुढील टप्प्यातील कृती आराखडा ठरवण्यात आला.
यावेळी कॉ. हरिभाऊ तांबे, मा. उदयजी सांगळे, मा. नारायणशेठ वाजे, मा. गोविंदरावजी लोखंडे, मा. दत्ताजी वायचाळे, कॉम्रेड गणेश ताजणे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकमताने रेल्वे आंदोलन व्यापक स्वरूपात नेण्याचा निर्धार व्यक्त केला.
या बैठकीमुळे सिन्नर परिसरातील रेल्वे प्रश्नांवर एकत्रित आवाज बुलंद होण्यास बळ मिळाले असून, आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचे संकेत देण्यात आले.