राष्ट्रीय किसान मोर्चाचे किनवटमध्ये राज्यव्यापी धरणे आंदोलन; शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी निवेदन सादर


किनवट :
शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीने राज्यव्यापी धरणे आंदोलन दि. १५ डिसेंबर २०२५ रोजी किनवट येथे शांततेत पार पडले. हे धरणे आंदोलन कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालय, किनवट येथे आयोजित करण्यात आले होते.

आंदोलनाच्या वेळी राष्ट्रीय किसान मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव व सभापती यांना सादर केले. शेतमालाला हमीभाव, बाजार समितीतील पारदर्शक व्यवहार, शेतकऱ्यांवरील अन्यायकारक नियम रद्द करणे आदी मागण्यांवर यावेळी लक्ष वेधण्यात आले.

राज्यभर सुरू असलेल्या या आंदोलनाला किनवट तालुक्यातील शेतकरी व क्रांतिकारी कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आंदोलन शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले.

या धरणे आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व शेतकरी, पदाधिकारी व क्रांतिकारी कार्यकर्त्यांचे राष्ट्रीय किसान मोर्चा, किनवट जिल्हा युनिटच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे.

Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp