नांदेडमध्ये ‘कुष्ठरोग तपासणी मोहीम’ परिणामकारक; १५ दिवसात १८१ नवीन रूग्ण ओळख


नांदेड :
 केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार व राज्यस्तरीय उपक्रमाचा भाग म्हणून नांदेड जिल्ह्यात १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२५ या कालावधीत ‘कुष्ठरोग शोध अभियान’ (LCDC) प्रभावीपणे राबविण्यात आले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, जिल्हा चिकित्सक (सिव्हिल सर्जन) डॉ. संजय पेरके तसेच सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. बालन शेख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील आरोग्य पथकांनी घराघरातून तपासणी केली.


अभियानातील महत्त्वपूर्ण आकडेवारी :*
सर्वेक्षणासाठी निवडलेली लोकसंख्या : 25,65,958
तपासलेली लोकसंख्या : 25,20,600
तपासलेली घरे : 5,13,192
संशयित कुष्ठरुग्ण : 17,789
नवे निदान झालेले कुष्ठरुग्ण : 181
या मोहिमेमुळे जिल्ह्यातील 181 नव्या रुग्णांचे निदान होऊन त्यांच्यावर तातडीने बहुविध औषधोपचार (MDT) सुरू करण्यास मदत झाली. त्यामुळे रोगाचा पुढील प्रसार रोखण्यास हातभार लागणार आहे.

या मोहिमेच्या यशात आशा स्वयंसेविका, पुरुष स्वयंसेवक आणि आरोग्य कर्मचारी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. कुष्ठरोग पूर्णपणे उपचारक्षम असल्याने नागरिकांनी गैरसमज दूर करून आरोग्य विभागास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

अभियान यशस्वी करण्यासाठी योगदान देणाऱ्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, जिल्हा चिकित्सक डॉ. संजय पेरके व डॉ. बालन शेख यांनी मनापासून आभार मानले आहेत.
Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp