किनवट : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त किनवट शहरातील शिवाजी नगर भागात आज (ता.६) सकाळी १० वाजता डॉ. आंबेडकरांच्या अर्धाकृती पुतळ्यासमोर अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
प्रारंभी भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके, आमदार भीमराव केराम, माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, रिपाइं चे मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष दादाराव कयापाक, प्राचार्या शुभांगीताई ठमके, सेक्युलर मुव्हमेंट चे जिल्हाध्यक्ष ॲड. मिलिंद सर्पे, पीरिपा चे जिल्हाध्यक्ष विनोद भरणे, प्राचार्य आनंद भालेराव,दीपक ओंकार, दशरथ पवार,ॲड. सम्राट सर्पे, निखिल कावळे आदी मान्यवरांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी महेंद्र नरवाडे व अनिल उमरे यांनी सामुदायिक वंदना घेतली.सूत्रसंचालन उत्तम कानिंदे यांनी केले.
कार्यक्रमास विविध पक्ष व संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.सामाजिक न्याय विभागाच्या वतीने परिसरात आवश्यक तयारी करण्यात आली होती. महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरासह परिसरातील भीम अनुयायांनी पुतळ्याजवळ गर्दी केली. दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो अनुयायांनी महामानवांना अभिवादन केले.
महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधत "युवा पॅंथर" संघटनेतर्फे रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले.


