किनवट : जागतिक स्तरावरील बौद्ध विचार प्रसार, धम्म अभ्यास, संवाद व सांस्कृतिक देवाणघेवाण यासाठी १५ वी जागतिक बौद्ध धम्म परिषद येत्या १४ व १५ फेब्रुवारी २०२६ रोजी किनवट येथे आयोजित करण्यात आली आहे. समतानगर येथील भीमयान बुद्धविहार परिसरात शनिवार व रविवार या दोन दिवसांत ही परिषद पार पडणार आहे.
या परिषदेत देशभरातील भिक्षू, विचारवंत, संशोधक, विद्यार्थी यांच्यासह बौद्ध अनुयायांची मोठ्या संख्येने उपस्थिती अपेक्षित असून, किनवटसाठी हा ऐतिहासिक व अभिमानाचा क्षण ठरणार आहे.
परिषदेसाठी स्वागताध्यक्ष दत्ता उद्धवराव कसबे असून मार्गदर्शनासाठी जनार्धन भवरे, अरुण आळणे, अॅड. सुभाष ताजणे, नितीन कावळे, शेषेराव लढे, जितेंद्र कांबळे, माधव धुप्पे, डॉ. अर्जुन चव्हाण, देविदास मुनेश्वर, प्रा. महेंद्र घुले यांची साथ लाभणार आहे.
• दहा दिवसीय श्रामणेर प्रशिक्षण शिबीर
याच परिषदेमध्ये श्रद्धा, शिस्त, विधी व बौद्ध प्रशिक्षणासाठी १० दिवसीय विशेष श्ररामणेर प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबीर ०६ ते १५ फेब्रुवारी २०२६ दरम्यान होणार असून देशभरातून बाल-तरुण भिक्षू व सहभागी यामध्ये सराव करतील.
•आयोजक व संपर्क
शिबीर व परिषदेचे समन्वयन दिनेश कांबळे, सुधाकर हलवले, दयानंद कांबळे, विजय कांबळे, दिलीप मुनेश्वर, महेंद्र वासाटे, अनिल उमरे, दर्शन साळवे, कोमल भवरे, आकाश कांबळे, प्रभाकर भगत, राजू कांबळे, सतीश घुले आदी करत असून विविध समित्यांमार्फत कार्यक्रमाची तयारी जोरात सुरु आहे.
संपर्कासाठी प्रदीप सावते, युवराज कांबळे, भैय्यासाहेब सोरटे, दीपक आढागळे, अमोल गोवंदे, अनिल बंगाळे, चंद्रभीम होजेकर, बंडू परेकार, अमर शिंदे, विजय पाटील, किशन परेकार, शिलरत्न पाटील इत्यादी कार्यकर्ते मार्गदर्शन करत आहेत.
•आयोजन समिती
१५ वी जागतिक बौद्ध धम्म परिषद, किनवटचे अध्यक्ष प्रेमानंद कानिंदे, संयोजक लक्ष्मण भवरे, तर प्रविण गायकवाड, अनिल तसेच सचिव सुरेश मुनेश्वर यांच्यावर मुख्य जबाबदारी असून अमोल भवरे, माधव कांबळे, गौरव कदम, चंदू वाठोरे, सिद्धार्थ सूर्यभान, दीपक मुनेश्वर, संदीप लव्हाळे, राहुल भगत, निवेदक कानिंदे हे सदस्य म्हणून कार्यरत आहेत.
•धार्मिक-सांस्कृतिक वातावरणाला नवी दिशा
किनवटमध्ये होणारी ही आंतरराष्ट्रीय परिषद बौद्ध धम्माचा प्रचार-प्रसार, नव्या विचारांचा प्रचार, तसेच आधुनिक समाजातील नैतिक, सामाजिक, मानवी मूल्यांच्या बदलत्या प्रश्नांवर प्रकाश टाकणारी ठरणार आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
धम्म परिषदेच्या निमित्ताने किनवटमध्ये मोठे धार्मिक-सांस्कृतिक वातावरण निर्माण होणार असून स्थानिकांना रोजगार, पर्यटन आणि सांस्कृतिक लाभही मिळेल, असा आयोजकांचा विश्वास आहे.

