मूर्तिजापूर : येथील टेलिफोन कॉलनी कलाविष्कार साहित्य व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन मंडळाच्या कार्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले.
कार्यक्रमाच्या वेळी संत गाडगेबाबा कर्मभूमी सेवा प्रतिष्ठानचे संचालक व साहित्यिक अनिल डाहेलकर, सुनिल वानखडे, कलाविष्कारचे संचालक गझलकार मिलिंद इंगळे, कलासृष्टी प्रतिष्ठानचे संस्थापक कवी व गायक कल्पक कांबळे यांनी आदरांजली वाहिली.
यावेळी विनोद धामणे, शुभम नकवाल, पंकज थेरे, रोशन जाधव, आदित्य जाधव, भारती इंगळे, कौडिण्य इंगळे, पारमी इंगळे आदींची उपस्थिती होती.
Tags
||जिल्हा||
