‘बहुजनरत्न पत्रकार’ पुरस्काराने जयभीम पाटील गौरवित

 नांदेड : अखिल भारतीय आंबेडकर महासभा, जिल्हा नांदेड यांच्या वतीने महाकवी वामनदादा कर्डक जयंती महोत्सवाचे आयोजन कालवश हरिहरराव सोनुले नगरी, नरहर कुरुंदकर सभागृह (पिपल्स कॉलेज परिसर) येथे नुकतेच करण्यात आले. या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार जयभीम पाटील यांना बहुजनरत्न पत्रकार पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

हा सन्मान सामाजिक, साहित्यिक, कला, क्रीडा व पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाचा गौरव असल्याचे यावेळी मत व्यक्त करण्यात आले.

दिनांक ३० नोव्हेंबर २०२५ रोजी सायं. ५ वाजता झालेल्या या सोहळ्यात साहित्यिक राज गोडबोले यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन व्यंकटराव दुधंबे यांनी केले, तर प्रमुख अतिथी म्हणून ॲड. भीमराव हटकर, विश्वनाथ चितीरे, धनंजय बेलीकर, ललकारबाबू वानखेडे आदी मान्यवर उपस्थित होते.



पुरस्कार वितरण राज गोडबोले, व्यंकटराव दुधंबे, ॲड. हटकर, विश्वनाथ चितीरे, धनंजय बेलीकर, ललकारबाबू वानखेडे व सुरेश गजभारे यांच्या हस्ते करण्यात आले.

नांदेडच्या पिपल्स कॉलेज सभागृहात पार पडलेला हा सन्मान सोहळा केवळ पुरस्कार देण्यापुरता मर्यादित न राहता, बहुजन चळवळीतील योगदानाचे स्मरण करणारा आणि समाजाच्या कृतज्ञतेचा महत्त्वपूर्ण क्षण ठरला.

यावेळी विचारवंत, लेखक, समतावादी कार्यकर्ते, तसेच असंख्य बहुजन बांधव उपस्थित होते.



Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp