किनवट : पूर्व प्राथमिक विद्यार्थ्यांच्या भाषिक कौशल्यासह सर्जनशीलता विकसित व्हावी या उद्देशाने सेंट मेरी इंग्लिश स्कूल, कोठारी (चि.) येथे राईम्स कवितावाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. दि. ४ डिसेंबर २०२५ रोजी पार पडलेल्या या स्पर्धेत LKG व UKG या दोन गटांतील तब्बल ३२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
निरागस बोलीत इंग्रजी कविता सादर करताना विद्यार्थ्यांनी दाखवलेला आत्मविश्वास पाहून उपस्थितांनी कौतुकाचा वर्षाव केला.
LKG गट विजेते
प्रथम — कु. ज्ञानवी धापके
द्वितीय — अद्विक तुपे
तृतीय — प्रीतम बडे
UKG गट विजेते
प्रथम — कु. खुशी खुडे
द्वितीय — कु. विधी दुबे
तृतीय — कु. सानवी सर्पे
स्पर्धेस प्रमुख पाहुणे व परीक्षक म्हणून डॉ. शिल्पा सुंकरवार,अंबिका वैद्य व प्रज्ञा डोंगरे उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणास पालकांनी मोठा प्रतिसाद देत उपस्थिती लावली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिस्टर ग्लोरी, लीना मॅडम, शांती मॅडम, विष्णू जाधव , मारुती गुट्टे आणि बलजीत डुंगडुंग यांनी परिश्रम घेतले.


