गोकुंदयातील महात्मा फुले विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन


किनवट, ता.६ :
 स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांवर आधारलेले न्यायप्रणालीचे लोकशाही राज्य भारताला देणारे, शोषित-पीडित घटकांच्या हक्कांचे पुरस्कर्ते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, गोकुंदा (ता. किनवट) येथे अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला.

कार्यक्रमाला विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य प्रमोद मुनेश्वर, प्राचार्य राधेश्याम जाधव, उपमुख्याध्यापक किशोर डांगे, पर्यवेक्षक रघुनाथ इंगळे, संतोष बैसठाकूर, मुकुंद मुनेश्वर, मनोज भोयर यांच्यासह शिक्षक-शिक्षिका, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचा आढावा घेण्यात आला. सूत्रसंचालन प्रा. सुबोध सर्पे यांनी केले, तर आभार प्रा. शिवदास जावळे यांनी मानले.


Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp