किनवट, ता.७ : शनिवार पेठ येथील शेतकऱ्यांनी एकत्र येत शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेची स्थानिक शाखा स्थापन नुकतीच केली आहे. जवळपास तीन दशकांनंतर संघटित चळवळीला तालुक्यात नवीन दिशा मिळाल्याचे मानले जात असून, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आता स्वतः शेतकऱ्यांनीच पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मत युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष रमेश कदम यांनी व्यक्त केले.
कदम म्हणाले की, “शेतकरी संघटित झाल्यावरच प्रश्न प्रभावीपणे सरकारसमोर मांडले जातात. आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरं शेतकऱ्यांनीच शोधायची वेळ आली आहे.”
या बैठकीत रमण तिरुपती कागणे यांची शाखाप्रमुख, तर नागोजी विश्वनाथ मुंडकर उपाध्यक्ष, गणेश माधव घुकसे सचिव आणि प्रल्हाद बळीराम राठोड कोषाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
सदस्य म्हणून ज्ञानोबा रामराव केंद्रे, सुरेश तेजेराव मुंडकर, माधव रामजी गीते, उत्तम गोविंदराव केंद्रे, सुनील विष्णू जाधव, सुभाष धोंडीबा मुंडकर, शिवाजी बाळप्पा स्वामी, शिवाजी रामजी गीते, संतोष नामदेव गीते, माधव परसराम घोटेकर, अशोक कांबळे, आनंदराव घारके, आनंदराव गंगाराम आरवले, कोंडीबा गंगाराम सूर्यवंशी, पांडुरंग रंगराव वागढव, संतोष रमेश वागढव, कोंडीबा राजाराम वागढव, माधव काशिनाथ लाटकर, अशोक दिगंबर लाटकर, अशोक धोंडीबा केंद्रे, गोविंद लक्ष्मण चोले व बालाजी बाबाराव लालवाडे यांची निवड झाली.
