नांदेड : आज दिनांक १६ डिसेंबर २०२५ रोजी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) नांदेड जिल्हा कमिटीच्या वतीने नांदेड जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मा. मुख्यमंत्री महोदयांकडे नांदेड शहरात क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांच्या स्मारकाची उभारणी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
शहीद भगतसिंग यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेल्या बलिदानाची प्रेरणा आजच्या युवकांपर्यंत पोहोचावी, त्यांच्या विचारांचा वारसा जपला जावा तसेच राष्ट्रभक्ती, समाजपरिवर्तन व क्रांतिकारी मूल्यांची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने नांदेडमध्ये भव्य व सुसज्ज स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या निवेदन सादरीकरणाच्या वेळी एसएफआयच्या जिल्हा सचिव मीना आरसे, जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल कउडकर, तसेच शरद खंदारे, नेहा कउडकर, तेजपाल सिंग खेड (सामाजिक कार्यकर्ते), परनीत सिंग व विजेंदर सिंग उपस्थित होते.
शासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
Tags
||जिल्हा||
