कंधार येथील वकिलावर महसूल कर्मचाऱ्यांचा छळप्रकरणी किनवट तालुका वकील संघाचा ठराव, न्यायालयीन कामकाजाचा बहिष्कार
September 18, 2025
0
किनवट ,दि.१ : कंधार येथील वकिलावर झालेल्या गैरवर्तनाच्या घटनेचा निषेध म्हणून किनवट तालुका अभिवक्ता संघाने आज(दि .१८)तातडीच्या झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत महत्त्वाचा ठराव पारित केला आहे.
कंधार अभिवक्ता संघाचे सदस्य अॅड. शिवाजी गणपतराव मोरे यांना तहसील कार्यालय, कंधार येथे महसूल कर्मचाऱ्यांनी न्यायालयीन कामकाजासाठी कार्यालयात गेले असता विनाकारण अश्लील शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. या घटनेची फिर्याद पोलीस स्टेशनमध्ये नोंदविण्यासाठी गेले असता त्यांच्या विरोधातच शासकीय कामात अडथळा आणल्याचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा किनवट अभिवक्ता संघाने जाहीर निषेध नोंदवला आहे.
संघाच्या बैठकीत व्यक्त झालेल्या भावना मांडताना वकील बांधवांवर होत असलेला अन्याय, छळ व वाढत्या हल्ल्यांच्या प्रवृत्तीबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. या निषेधार्थ आज (ता.१८ ) सर्व वकील न्यायालयीन कामकाजात सहभागी न होता प्रकरणांचे अर्ज पुढे वाढवून घ्यावेत, असा निर्णय घेण्यात आला आहे.
तसेच न्यायिक अधिकारी महोदयांना विनंती करण्यात आली आहे की, वकिलांच्या भावना लक्षात घेऊन या दिवशी कोणत्याही प्रकरणात प्रतिकूल आदेश पारित करू नयेत.
तालुका अभिवक्ता संघाने एकजुटीने घेतलेला हा ठराव सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ठरावावर अध्यक्ष ॲड.किशोर मुनेश्वर, उपाध्यक्ष ॲड.टेकसिंग चव्हाण,सचिव ॲड.माझ बडगुजर, सहसचिव ॲड.सुरेश मुसळे, कोषाध्यक्ष ॲड.सम्राट सर्पे, ग्रंथपाल ॲड.विशाल कानिंदे यांच्यासह वरिष्ठ व कनिष्ठ वकीलांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
------------------------------------------------------•
ए
Post a Comment
0 Comments