"शेतकरी लुटवापसीसाठी ‘चलो अकोला’ : देशभरातील शेतकरी नेते एका व्यासपीठावर"

अकोला,ता.१८ : शेतकऱ्यांच्या लुटीचा पर्दाफाश करून त्यांच्या हक्कासाठी भव्य संवाद सभेचे आयोजन किसान ब्रिगेड महाराष्ट्राच्या वतीने करण्यात आले आहे. "चलो अकोला : शेतकरी लुटवापसी संवाद सभा" या नावाने होणारी ही सभा शुक्रवार, १९ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत स्व. नामदेवराव पोहरे सभागृह, मराठा मंडळ, रामदास पेठ पोलीस स्टेशन जवळ, अकोला येथे होणार आहे. या सभेत देशभरातील शेतकरी चळवळीतील दिग्गज नेत्यांची उपस्थिती राहणार आहे. भारतीय किसान युनियनचे राकेश टिकैत, प्रहार संघटनेचे बच्चुभाऊ कडु, अ.भा. किसान सभेचे डॉ.अशोक ढवळे, संयुक्त किसान मोर्चाचे डॉ .अजित नवले, किसान ब्रिगेडचे प्रकाश पोहरे व क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याशिवाय शेतकरी कामगार पक्षाचे भाई प्रदीप देशमुख, किसान खेतमजूर संघटनेचे व्ही. कोटेश्वर राव, तराई किसान युनियनचे तेजिंदरसिंग विर्क, किसान सभेचे अजय भगत तसेच विदर्भातील विविध संघटनांचे नेते व पदाधिकारी या व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. सभेला विशेष अर्थतज्ञ विश्वास उटगी, सामाजिक व राजकीय विश्लेषक आकाश जाधव, तसेच शेतकरी जागर मंचाचे प्रशांत गावंडेही मार्गदर्शन करणार आहेत. "जात, धर्म, पक्ष, संघटना व झेंडा विसरून शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सर्वांनी एकत्र यावे" असे आवाहन आयोजकांनी केले असून, हजारोंच्या संख्येने शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे,असे आवाहन किसान ब्रिगेडचे प्रवक्ते धनंजय मिश्रा यांनी केले आहे‌.
Previous Post Next Post

نموذج الاتصال

Chat on WhatsApp