नांदेड, दि. १८ : राष्ट्रीय संविधान बचाव अभियान तसेच विविध पक्ष आणि समविचारी जनसंघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु असलेले बेमुदत धरणे आंदोलन आज २९ व्या दिवशी तिव्र झाले आहे. १० ऑगस्ट २०२५ पासून सुरू असलेले हे आंदोलन प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असून, आंदोलनकर्त्यांनी मागण्या मान्य होईपर्यंत धरणे कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
प्रमुख मागण्या : ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात,जनसुरक्षा कायदा रद्द करावा,देशातील मतदार याद्यांतील गोंधळ दूर करून तातडीने नवीन याद्या तयार कराव्यात,शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा.
या आणि इतर विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन सुरू असून, याकडे जिल्हा तसेच राज्य प्रशासनाचे लक्ष वेधले जात आहे.
आजच्या आंदोलनात राष्ट्रीय संविधान बचाव अभियानाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. देविदास इंगळे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष तालुका सचिव व सिटू जिल्हा सचिव कॉ. गंगाधर गायकवाड, सिटू राज्य सचिव उज्वला पडलवार, राज्य महासचिव कॉ. अंबादास भंडारे, कार्याध्यक्ष दिगंबर घायाळे, नांदेड जिल्हा महासचिव व्यंकटी जाधव आदी मान्यवर सहभागी झाले. तसेच संजय वाघमारे डोणगावकर, गोपाळ वाघमारे, सुरेश वांगीकर, तुळशीराम भोसीकर, वाघमारे एस.एस., मंगेश वट्टेवाड, धनाजी कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली.
आंदोलनकर्त्यांनी मागण्या मान्य न झाल्यास लढा आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.
नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संविधान बचाव अभियानाचे बेमुदत धरणे आंदोलन तिव्र
byLokaawaj
-
0