नागपूर : भारतातील मुख्य धर्मांना आपापले पर्सनल लॉ असताना, बौद्धांचा स्वतःचा पर्सनल लॉ नसल्यानं, बौद्ध समाजाच्या न्याय व समानतेच्या हक्कासाठी राष्ट्रीय पातळीवरील एक मोठी बैठक आयोजित करण्यात आली आहे.
“नमो बुधाय ऑल इंडिया अॅक्शन कमिटी फॉर बौद्ध पर्सनल लॉ – जयभीम” या आघाडीच्या वतीने शनिवारी, २५ ऑक्टोबर २०२५ आणि रविवार, २६ ऑक्टोबर २०२५ रोजी क्रांतिकारी संत कबीर वाचनालय सभागृह, जयस्तंभ चौक, कामठी, नागपूर येथे ही राष्ट्रीय बैठक घेण्यात येणार आहे.
बैठकीत बौद्ध समाजाचे विविध प्रतिनिधी, न्यायतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. दया सागर बौद्ध (केंद्रीय अध्यक्ष, लखनौ), डॉ. अॅड. सत्यपाल कातकर (राजुरा, महाराष्ट्र), ए.के. नंद (गोंडा, उत्तर प्रदेश), प्रा. मनिराम डेकाटे (मुंबई), रंगराव गायकवाड (अहमदाबाद), विजय मेश्राम (उमरेड) तसेच देशभरातून अनेक बौद्ध समाजाचे नेते उपस्थित राहणार आहेत.
बैठकीत बौद्ध पर्सनल लॉची मागणी, त्यासाठी पुढील कारवाई, तसेच सुप्रीम कोर्टात रि-पिटीशन दाखल करण्याची रणनीती ठरवण्यात येणार आहे. बौद्ध समाजाच्या न्यायिक हक्कांसाठी एकमत दाखवत, पुढील पावले उचलण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात येणार आहे.
मुख्य आयोजक प्रदीप फुलझेले यांनी सांगितले की, “बौद्ध समाजाच्या हक्कांसाठी ही बैठक ऐतिहासिक ठरेल. समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय मिळावा यासाठी आम्ही सज्ज आहोत
Post a Comment
0 Comments